जामनेर(प्रतिनिधी)दहिगाव संत ता. पाचोरा जि. जळगाव येथील महसूल सेवक श्री तुकाराम संपत पाटील यांना तेथील ग्राम महसूल अधिकारी संभाजी गंगाधर पाटील यांनी काल दि.१०/१२/२०२४ रोजी कार्यालयात वसुली पावती बद्दल विचारणा केली असता तु काय माझा साहेब आहेस का? अशी उद्धट भाषा वापरून त्यांना मारहाण केली त्यात महसूल सेवक गंभीर जखमी झाले.
शासकीय कर्मचारी म्हणून संबंधीत ग्राम महसूल अधिकारी याचे वर्तन सदर पदास अशोभनीय आहे. भविष्यात असे प्रकरणं होऊ नये म्हणून संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांचेवर कडक कारवाई व्हावी या आशयचे निवेदन निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर यांना देण्यात आले या वेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष एजाज पठाण, कार्याध्यक्ष ईश्वर ठाकूर, सदस्य अमोल पाटील, पूजा पवार, राधा सुरवाडे, वैभव न्हावी, अमोल सटाले, सुनिल लोखंडे, गजानन मोरे, आकाश भोईटे, आकाश पाटील, मुन्ना पिठोडे, कौतिक शेजोळ आदी उपस्थित होते.
महसूल सेवकास मारहाण करणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी यांचेवर कारवाई साठी निवेदन

Leave a Reply