भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या कोनशिलेची विटंबना करून देशविघातक कृत्य करणाऱ्या समाज संटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.

जामनेर (प्रतिनिधी)परभणी शहरात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या कोनशिलेची विटंबना करून देशविघातक कृत्य करणाऱ्या समाज संटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून परभणी शहरात पोलीस प्रशासनाची होत असलेली एकतर्फी कारवाई थांबवून राज्यातील महापुरुष्यांच्या सर्व पुतळ्याजवळ कॅमेरे बसवणेत यावे जेणेकरून अश्या घटनांना आळ घालता येईल.अश्या आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री यांच्या नवे आज “भिम आर्मी” भारत एकता मिशन,जळगांव जिल्हा प्रमुख गणेश  सपकाळे यांच्या नेतृत्वात जळगांव जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी मा.अनंत पिनाडे  व जळगांव विभागाचे पोलीस उप-अधीक्षक मा.संदीप गावित  यांच्या द्वारा  देण्यात आले…. तसेच मागण्या पूर्णत्वास न आल्यास जळगांव जिल्हा बंद करणेत येईल व होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला. सदर प्रसंगी “भिम आर्मी” भारत एकता मिशन जळगांव जिल्हा प्रमुख गणेश सपकाळे व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *