जामनेर (प्रतिनिधी)भारतीय जैन संघटना जामनेर शाखा कडून स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवादिनी इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुल मध्ये वकृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनील चव्हाण सर होते व त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्राबद्दल माहिती देऊन त्यांच्या अंगी असलेले गुण विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन केले.
भारताची शिक्षण व्यवस्था,2025 चे भारत,देशाची प्रगती, या बिषयावर वकृत्व स्पर्धा घेण्यात झाली. या स्पर्धेत 45 मुला मुलींनी सहभाग घेतला व त्यामधुन प्रथम क्रमांक प्रांजल चौधरी , व्दितीय क्रमांक गार्गी चौधरी ,तृतीय क्रमांक कोहिनूर मोरे यांनी प्राप्त केला.*या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष श्री सुभाष मोरे सर यांनी विशेष कष्ट घेतले.
*बीजेस विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत यांनी प्रास्ताविक मध्ये स्मार्ट गर्ल शिबिर,रक्तदान शिबिर,परिचय सम्मेलन,वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थी सत्कार,व्यवसाय संबधित बदलोगे तो बढोगे,मूल्यवर्धन,करियर गाइडन्स, दंपत्ती सक्षमीकरण,नैसर्गिक आपत्ती,भारतातील 100 जिल्हे जल पर्याप्त गाव अभियान आदी करत असलेल्या कार्याबद्दल माहिती दिली.*
*कार्यक्रमात उपमुख्यध्यापक सदाशिव चौरे सर,पर्यवेक्षक विवेक महाजन उपस्थित होते. निकिता पाटील मैडम व सचिन देशमुख सर यांनी परीक्षण केले.विजेत्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे रु.700,500 व 300 रुपये रोखं,प्रमाणपत्र आणी ट्रॉफी म्हणून पारितोषिक भारतीय जैन संघटना जामनेर शाखा यांच्याकडून देण्यात आले.
*पर्यवेक्षक गणेश पाटील सर यांनी उद्दात्त हेतूने भारतीय जैन संघटना कार्य करत आहे असे सांगितले.*
*कार्यक्रमाला बीजेएसचे विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत,सदस्य सचिन चोपड़ा, शहर अध्यक्ष कुशल बोहरा, सचिव संकल्प लोढ़ा,सदस्य विकास ललवाणी,महिला शहर अध्यक्ष मोना चोरडीया,उपाध्यक्ष राखी लोढ़ा,सदस्य जयश्री लोढ़ा आदि उपस्थित होते.सुत्रसंचालन नीलेश पवार सर तर आभार प्रदर्शन गणेश पाटील सर यांनी मानले.*
Leave a Reply