जामनेर (प्रतिनिधी):- जामनेर शहरात माजी उपनगराध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या मुलाच्या घरात भर दिवसा चोरी झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी 6-30 ते 11-30 वाजल्याच्या सुमारास वाकी रोड जामनेर येथील बेस्ट बाजार जवळील नवकार प्लाझा इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर ही चोरी झाली असून 50ग्रॅम सोने व 20,000 रोकड चोरट्यांनी लांबवली आहे. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार सहा. पोलीस निरीक्षक सागर काळे,सचिन महाजन, दीपक जाधव, राहुल महाजन घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज जामनेर मधील नवकार प्लाझा या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहतात. माजी नगरसेवक श्रीराम महाजन यांचे लहान चिरंजीव किरण महाजन व त्यांची पत्नी दोघेही शिक्षक असून सकाळची शाळा असल्याने 6-30 वाजता शाळेत गेले घरी कुणीही नसल्याने घराला नेहमी प्रमाणे कुलूप लावून शाळेत गेले. किरण महाजन 11-30 च्या दरम्यान घरी आले असता घराचा दरवाजा उघडा दिसला चोरट्यांनी दरवाज्याची कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटातील रोख रक्कम आणि 50 ग्रॅम सोन चोरीला गेले असल्याची माहिती किरण महाजन यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळतात घटनास्थळी पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवीत डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट पथक यांनी चौकशी केली आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी यावेळी दिली. तसेच नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी केले.
भरवस्तीत सकाळी लाखोंची चोरी करून चोरटे प्रसार.

Leave a Reply