नांद्रा (प्रतिनिधी)नाचनखेड़ा येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगार बंधू-भगिनींना मोफत गृहपयोगी साहित्य संच (भांडी) वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास उपस्थित राहून जमलेल्या सर्व कामगार बंधू भगिनींसोबत संवाद साधताणा गिरीष भाऊ महाजन यांनी
प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात, मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार कामगारांच्या हितासाठी सदैव तत्पर आहे हा विश्वास यावेळी व्यक्त केला व लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणी साठि माझ्यासह कार्यकर्ते नेहमी परिश्रम घेऊन जनतेला लाभ मिळवून देतात असे म्हटले व कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व विकासकामांसाठी नेहमी मागे लागून पाठपुरावा करून कामे मंजूर करून घेतो असे म्हणतांना हर्षल चौधरी व कार्यकर्त्यांच्या टिमचे भाजपा पदाधिकार्यांनी कौतुक केले
याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह कामगार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply