जामनेर (प्रतिनिधी)जामनेर येथे उद्या दिनांक 15 रोजी बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते तसेच राज्याचे जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांचे जामनेर येथे भगीरथीबाई वाचनालय येथे दुपारी दोन वाजता बंजारा समाजाच्या संवाद बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत जळगाव जिल्ह्यात सुमारे पाच लाख बंजारा समाजाची लोकसंख्या असून जवळपास अडीच लाख मतदारसंख्या आहे जळगाव जिल्ह्यात संपूर्ण तालुक्यात बंजारा समाजाची लोकसंख्या उल्लेखनीय आहे जामनेर तालुक्यात बंजारा समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असून बंजारा समाजाच्या अडीअडचणी तांड्या पाड्यावरच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्याचे निराकरण करण्यासाठी या उदात्त हेतूने मंत्री संजय राठोड येत आहेत या समाज बैठकीसाठी जामनेर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे व आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन डॉक्टर संतोष राठोड यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी मूलचंद नाईक,लालचंद नाईक,डॉ.प्रकाश चव्हाण,दत्ता राठोड,धरमसिंग चव्हाण, भाईदास चव्हाण,राजेश नाईक,सुमित चव्हाण,नटवर चव्हाण ,एड.भरत पवार , राजमल चव्हाण,रोहन राठोड,भाऊल चव्हाण,आनंद जाधव,नामदेव राठोड,प्रवीण जाधव,प्रवीण राठोड आदी उपस्थित होते.
Leave a Reply