जामनेर (प्रतिनिधी)फत्तेपूर गावाची कन्या श्रीमती वर्षा रंगनाथ लोखंडे यांनी विधी शिक्षणात विशेष प्राविण्य मिळवून (LL.B.) वकील पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले असून, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कै. रंगनाथ साखरू लोखंडे (माजी मॅनेजर, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांच्या कन्या असलेल्या वर्षा यांनी आपल्या वडिलांच्या न्यायनिष्ठ स्वभावाचा आदर्श ठेवून न्यायव्यवस्थेत योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांचे हे शैक्षणिक यश गावासाठीही अभिमानास्पद ठरत आहे.
या प्रवासात त्यांचे पती प्रा. अविनाश आत्माराम निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले. “निकम सरांच्या प्रेरणेमुळेच यशाकडे वाटचाल सुलभ झाली,” असे भावनिक उद्गार वर्षा यांनी यावेळी काढले.
वर्षा यांच्या यशस्वी वाटचालीसाठी विविध मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्या समाजसेवा व न्याय मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून एक उत्कृष्ट वकील म्हणून कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या यशामागे त्यांचे पती अविनाश निकम , आई श्रीमती सुशिलाबाई लोखंडे, बहीण सौ. मनीषा संतोष पारधे, भाऊ महेंद्र लोखंडे तसेच संपूर्ण निकम कुटुंबाचे मोलाचे योगदान आहे.
वर्षा लोखंडे यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण फत्तेपूर गावातून आणि श्रीमती प्रा. शुभांगी मुरलीधर चौधरी तसेच स्नेहल पाटील यांच्याकडून विशेष शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Leave a Reply