प्राथमिक सदस्यता नोंदणीत जामनेर विधानसभा मतदारसंघाचे उद्दिष्ट १००% पूर्ण

जामनेर(प्रतिनिधी)संघटन पर्व अभियानांतर्गत प्रत्येक बूथवर सुरू असणाऱ्या प्राथमिक सदस्यता नोंदणीमध्ये पक्षाच्या वतीने देण्यात आलेले उद्दिष्ट जामनेर विधानसभा मतदारसंघाने यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्यासह जामनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन !

३४२ बूथपैकी प्रत्येक बूथवर २०० असे एकूण ६८,४०० प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट जामनेर मतदारसंघातील स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांपुढे होते. हे उद्दिष्ट १००% पूर्ण करत, एकूण ७०,८२० प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्यात त्यांना यश आले आहे.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा महायुती सरकार यांच्यावर असणारा अतूट विश्वास यातून दिसून येतो.

उद्दिष्ट पूर्ण झाले असले तरीही जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावस्कर यांनी जामनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *