जामनेर(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे; जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव; आणि पंचायत समिती जामनेर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण शिबीर दिनांक २ ते १२ जून २०२५ दरम्यान जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी विद्यालयात यशस्वीरीत्या संपन्न झाले.
इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालय, जामनेरपुरा येथील उपशिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार यांनी जिल्हास्तरीय सुलभक म्हणून विशेष उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभात मुख्याध्यापक प्रा. एस. आर. चव्हाण आणि उपप्राचार्य प्रा. के. एन. मराठे यांच्या शुभहस्ते आंब्याचे रोप, स्नेहवस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी प्रा. के. डी. निमगडे, प्रा. जी. जी. अत्तरदे, तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शालेय सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षा प्रा. सविता महाजन, सचिव प्रा. सुमित काबरे, समिती सदस्य प्रा. सोनूसिंग पाटील आणि प्रा. सचिन बावस्कर यांनी संयुक्तपणे केले.
या यशस्वी कार्याबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, उपाध्यक्ष विनीत महाजन, संचालक के. व्ही. महाजन, श्रीराम नाना महाजन आणि इतर संचालक मंडळ सदस्यांनी प्रा. समीर घोडेस्वार यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
————————————–
Leave a Reply