जळगांव (जितेंद्र सोनवणे)प्रविण दादा गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कार्यवाहीची मागणी!!संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, बामसेफ यांच्यासह परिवर्तन वादी संघटना कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !!! शिवतीर्थावर प्रवीण गायकवाड यांच्या प्रतिमेस घातला दुग्धाभिषेक!!! ! जळगाव (प्रतिनीधी)जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ बामसेफ यांच्यासह परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा.प्रविणदादा गायकवाड यांच्या प्रतिमेस शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ दुग्धाभिषेक करून प्रविणदादा यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याच्या आरोपींना अटक करुन या घटनेची सखोल चौकशी करत कठोर कार्यवाही व्हावी या बाबत खालील आशयाचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले
रविवार १३ जुलै २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रविणदादा गायकवाड यांच्यावर काही गुंड प्रवृतींच्या लोकांनी शाईफेक करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत भ्याड हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून हा हल्ला फक्त प्रविणदादा यांच्यावर नसून हा हल्ला या देशातील तमाम शिवराय – फुले – शाहु – आंबेडकर यांच्या समता , बंधुता व न्यायाच्या तत्वांवर चालणाऱ्या विचारवंतांवर असून यापूर्वी देखील या देशात याच मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा मंत्र देणारे मा.नरेंद्र दाभोळकर , कॉ.गोविंद पानसरे , पत्रकार गौरी लंकेश व ज्येष्ठ विचारवंत एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्त्या घडवून आणण्यात आल्या आहेत.
प्रसारमाध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला दीपक काटे नावाचा गुंड व त्याच्या आठ ते दहा इतर गुंड साथीदारांनी मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु स्थानिक पोलिसांनी या आरोपींना अटक न करता सोडून दिले आहे. तरी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने या प्रकरणात बारकाईने लक्ष देत या हल्ल्यातील सर्व आरोपी व त्यांच्या मागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अन्यथा याच पद्धतीने विचारवंतांना संपवण्याचे प्रयत्न सुरु राहिल्यास महात्मा गांधीच्या अहिंसेच्या विचारांवर चालणाऱ्या भारत देशाची प्रतिमा जगात मलीन होऊन हा देश अराजकतेच्या मार्गावर जाण्यास वेळ लागणार नाही.
यावेळी संभाजी ब्रिगेड सामाजिक चे प्रदेश संघटक श्याम पाटील , जिल्हाध्यक्ष तुषार सांवत , संभाजी ब्रिगेड राजकीय चे जळगाव पुर्व जिल्हा प्रदिप गायके, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष विजय पाटिल शहर कार्याध्यक्ष मयूर चौधरी , लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे , बामसेफचे मुकुंद सपकाळे , मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील , सुरेंद्र पाटील , राम पवार , शोभाराम प्रतिष्ठाचे नरेंद्र पाटील , अनिरुद्ध शिसोदे , शुभम पवार , गणेश पाटील,कल्पेश पाटील, भरत पाटील, अविनाश पाटील ,संदीप मांडोळे, सतीश लाठी, राकेश राजपूत, राकेश जैन, संदीप पाटील,रवींद्र पाटील, धवल पाटील,प्रमोद पाटील,राहुल पाटील,संजय चव्हाण,सुमित्र अहिरे, देवानंद निकम,रवींद्र तायडे,देशमुख साहेब यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
Leave a Reply