जामनेर (प्रतिनिधी)पाळधी ता.जामनेर येथे फलोत्पादन पिकावरील कीड,रोग,सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प सन 2024 /25 अंतर्गत केळी पिकाच्या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शेतीशाळा ही विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय,नाशिक येथील सर्वेक्षण अधिकारी संजय सोनवणे यांच्या समक्ष घेण्यात आली. शेतीशाळेत शेतकऱ्यांना केळी पिकाची काढणीपश्चात तंत्रज्ञान व एकात्मिक खत व्यवस्थापनाबद्दल तसेच कृषी विभागाच्या इतर योजनांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांशी संवाद साधून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढीवर भर देण्याचे आवाहन संजय सोनवणे यांनी केले. तसेच कृषी विभाग सदैव तुमच्या पाठीशी उभा असून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तरुणांनी शेतीशाळेत व शेतीत सहभाग वाढवण्याचे आवाहन देखील याप्रसंगी करण्यात आले. पाळधी गावचे माजी सरपंच कमलाकर पाटील यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याबद्दल आवाहन केले.शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी समूह रंजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शेतीशाळेस तालुका कृषी अधिकारी जितेंद्र पाटील व कृषी विभागातील इतर अधिकारी कर्मचारी तसेच शेतकरी बंधू उपस्थित होते.
पाळधी येथे केळी पिकावर शेतीशाळा संपन्न

Leave a Reply