मलकापूर | १ जून २०२५ :पत्रकारी क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल शिवस्वराज्य न्युजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे यांना इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५ ने सन्मानित करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर दैनिक अहिल्याराज च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रभरातून आलेल्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी शिवस्वराज्य न्युजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले. समाजातील विविध समस्या, स्थानिक प्रश्न, तसेच सामाजिक भान जपत केलेले लेखन व पत्रकारितेतील प्रामाणिक कार्य यामुळे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात मलकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब, हिंदी मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, क्रीडा क्षेत्रातील प्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनाही इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले.
या सन्मानामुळे नितीन इंगळे यांच्या कार्याला नवी दिशा लाभेल व नव्या पत्रकारांसाठी ते प्रेरणास्थान ठरतील, असे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.
Leave a Reply