ना.गिरीश महाजन यांनी मंत्री पदाची शपथ घेताच जामनेर मध्ये जल्लोष

जामनेर (प्रतिनिधी)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आज 15 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे राजभवनात आ. गिरीश महाजन यांनी मंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली महाविद्यालयीन विद्यार्थी असताना,गिरीश महाजन 1978 मध्ये ABVP चे सक्रिय सदस्य होते. ABVP मध्ये, त्यांनी तळागाळातील कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली जिथे त्यांनी भिंती रंगवल्या आणि राजकारण्यां साठी प्रचार पोस्टर वाटले. नंतर पक्षाने दाखल घेऊन त्यांची अभाविपच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
महाजन यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला झाली, जेव्हा ते महाराष्ट्रातील भारतीय जनता युवा मोर्चाचे ( भाजपची युवा शाखा) तालुकाध्यक्ष बनले.
1992 मध्ये जामनेरच्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाजन निवडून आले. 1995 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले . 2024 पर्यंत त्यांनी आमदार म्हणून 6 वी कार्यकाळ पूर्ण केली. महाजन यांनी 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री म्हणून शपथ घेतली. 29 ऑगस्ट 2023 पासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम पाहत आहेत . 2024 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आज मंत्री पदाची शपथ घेतली.हा शपथविधी सोहळा जामनेर येथील राजमाता जिजाऊ चौकात मोठ्या एलईडी स्क्रीनवर शपथविधीचे प्रसारण करण्यात आले यावेळी जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील माजी न प गटनेते डॉ प्रशांत भोंडे, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, डॉ.संजीव पाटील, प्रा. शरद पाटील,राजमल भागवत, राजधर पांढरे, युनुस शेख, ना. गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे,जामनेर शहर अध्यक्ष रवींद्र झाल्टे माजी नगरसेवक अतिश झाल्टे,उल्हास पाटील, बाबुराव हिवराडे नाजिम पार्टी यांच्यासह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने या जल्लोषात सहभागी झाले होते यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरत गुलालाची उजळण करत एकमेकांना लाडू भरवण्यात आले आमदार गिरीश महाजन यांचा सातव्यांचा विजय झाला असून तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा संपन्न झाल्यामुळे आमदार गिरीश महाजन यांना जामनेर तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी अभिनंदन करीत नामदार गिरीश महाजन यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *