नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन

जामनेर(प्रतिनिधी)प्रशासकीय सुधार आणि लोक शिकायत विभाग कार्मिक, लोक शिकायत और पेंशन मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत तसेच जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार सुशासन सप्ताह (Good Governance Week) अंतर्गत प्रशासन गाव की ओर मोहीम दि. 19 डिसेंबर 2024 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान सर्वत्र लोकशाही दिन राबविण्यात येणार आहे.सदर मोहिमे दरम्यान लोकांच्या तक्रारी, विविध प्रश्न समस्या सोडविण्याच्या दृष्टीने तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन जामनेर तहसील कार्यालयात तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दिनांक 19/ 12 /2024 रोजी सकाळी 11 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांच्या काही समस्या तक्रारी याचे निवारण करण्यासाठी सर्व विभागाचे अधिकारी या लोकशाही दिनी उपस्थित राहणार असून नागरिकांनी आपल्या समस्या तक्रारी गाऱ्हानी लोकशाही दिनी मांडून त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केले आहे. 19 ते 24 डिसेंबर दरम्यान मंडळाच्या स्तरावर सर्व ठिकाणी पाळधी दिनांक 23 /12/ 2024 सकाळी 11 वाजता वाकडी 21/12/2024 सकाळी 11 वाजता गारखेडा 20/12/2024 सकाळी 11 वाजता शेंदुर्णी 24/ 12/ 2024 सकाळी 11 वाजता मालदाभाडी 23/ 12/ 2024 सकाळी 11 वाजता पहूर 24/12/2024 सकाळी 11 वाजता तोंडापूर 19/12/2024 सकाळी 11 वाजता जामनेर 23/ 12/ 2024 सकाळी 11 वाजता नेरी 24/ 12/ 2024 सकाळी 11 वाजता फत्तेपूर 20 /12 /2024 सकाळी 11 वाजता या महसूल मंडळाच्या स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या तक्रारी समस्या गाऱ्हानी लोकशाही दिनी मांडून त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *