जामनेर(प्रतिनिधी):- दि.८ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर, राज्य शासन (नगर विकास विभाग) द्वारा जामनेर नगरपरिषदेच्या विविध प्रभागांसाठी आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी विनय गोसावी मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आले आहे. या पूर्वी मंत्रालयात काढण्यात आलेले नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले असून नगरसेवक पदी सुद्धा महीला अधिक असणार आहेत. या आरक्षण घोषणेने स्थानिक इच्छुक यांचा हिरमोड झाला आहे. आरक्षण प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आयोग व प्रशासनाने योग्य पद्धतीने प्रभाग निहाय आरक्षण ठरविले आहे.,महिलांसाठी, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), व इतर मागास प्रवर्ग (OBC) यांसारख्या प्रवर्गांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.,जामनेर नगरपरिषदेतील काही प्रभागांसाठी हे आरक्षण “महिला खुला प्रवर्गातील” म्हणून ठरले आहे, ज्यामुळे महिलांना स्थानिक नेतृत्वात अधिक भाग घेण्याची संधी यामुळे मिळणार आहे.,या आरक्षण निर्णयामुळे, वर्तमान नगरपरिषद सदस्यांच्या आणि राजकीय इच्छुक पक्षांच्या रणनीतीत बदल होण्याची दाट शक्यता आहे.
प्रभाग निहाय आरक्षण असे,
१ अ – अ. जाती – १ ब महीला – सर्व साधारण
२ अ – सर्व साधारण – २ ब महीला – सर्व साधारण
३ अ – सर्व साधारण- ३ ब महीला – ना मा प्र
४ ज – सर्व साधारण – ४ ब महीला – ना मा प्र
५ अ – सर्वसाधारण – ५ ब महीला – सर्व साधारण
६ अ ना. मा प्र – ६ ब महीला – सर्व साधारण
७ अ-ना मा प्र – ७ ब महिला – सर्वसाधरण
८ अ – सर्व साधारण – ८ ब महीला – ना मा प्र
९अ – सर्व साधारण – ९ ब महीला – ना मा प्र
१० अ-सर्व साधारण – १० ब महीला अ.जाती
११ अ – ना.मा.प्र – ११ ब महीला – सर्वसाधारण
१२ अ- सर्व साधारण – १२ ब महीला सर्वसाधारण
१३ अ – सर्वसाधारण – १३ ब महीला (अ.जमाती)
यावरून जामनेर नगर परिषदेत महीला राज दिसायला मिळेल.
स्थानिक पातळीवरील नेतृत्वात विविध प्रवर्गांचा समावेश वाढेल.,महिला प्रतिनिधी, अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवार यांना अधिक संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.,राजकीय पक्ष व उमेदवार ही घोषणा पाहून तातडीचे कामाला लागतील.कोणत्या प्रभागात कोणत्या प्रवर्गाचे उमेदवार उभे करायचे हे आता राजकीय नेत्यांची डोकेदुखी ठरणार आहे. या आरक्षण सोडतील सर्वपक्षीय पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply