जामनेर(प्रतिनिधी)राज्याचे जलसंपदा तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारत बांधकाम भूमिपूजन सोहळा मंगळवारी दिनांक 11 रोजी सकाळी 11 वाजता जामनेर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ साधनाताई गिरीश महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कुदळ मारून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

Oplus_131072
प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुनील पाटील जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी जळगाव तहसीलदार श्री नानासाहेब आगळे श्री एस बी चासकर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जामनेर शितल राजेंद्र लेकरूवाळे तावडे उपअधीक्षक भूमी अभिलेख संदीप पाटील दुय्यम निबंधक तसेच ओमकार कन्स्ट्रक्शन यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाला सर्वात जास्त महसूल दुय्यम निबंध कार्यालयाच्या माध्यमातून जमा होत असतो खरेदी-विक्री या सह विविध सेवा नागरिकांना या कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात येतात मात्र स्वतःची जागा या कार्यालयाची नसल्याने बांधकाम विभागाच्या आवारात तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय सुरू असल्याने अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.
जळगाव रोड वरील सोनबर्डी शेजारी स्वतःच्या प्रशस्त अशा इमारतीचे भूमिपूजन आज झाल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता मात्र सर्वच शासकीय कार्यालय हे मध्यवर्ती भागात असून दुय्यम् निबंधक कार्यालय हे काही अंतरावर असल्याने ग्राहकांची गैरसोय होण्याची शकता नाकारता येत नाही. भूमिपूजन सोहळा प्रसंगी दुय्यम निबंध कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सर्व स्टॅम्प वेंडर भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते.
Leave a Reply