जामनेर (प्रतिनिधी)तेली समाज पंच मंडळ जामनेर व महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ जामनेर तालुका यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन संत जगनाडे महाराज सभागृह गोपाल नगर हिवरखेडा रोड जामनेर या ठिकाणी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून डॉ. चारुशीला यमुना तुकाराम चौधरी निवासी नायब तहसीलदार मलकापूर या उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री दत्तात्रय तुकाराम चौधरी सचिव श्री अनिल पाटील सर, श्री अशोक चौधरी भुसावळ, श्री बी. एम. चौधरी जळगाव, वैशालीताई चौधरी, पोलीस उप निरीक्षक अनिल शिवाजी चौधरी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमात इयत्ता दहावी बारावी व पदवीधर अशा एकूण 95 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री योगेश पाटील सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री विक्रम चौधरी सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेली समाज मंडळ जामनेरचे अध्यक्ष श्री सोपान लक्ष्मण चौधरी, श्री सुरेश पंडित चौधरी, श्री सुभाष माधव चौधरी, रामेश्वर पाटील, निखिल भोलाने, पप्पू चौधरी, मुकेश चौधरी, नीरज चौधरी, पत्रकार श्री किरण चौधरी, मयूर चौधरी,किशोर चौधरी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Leave a Reply