जामनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे; जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय; तसेच जामनेर पंचायत समिती शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूल, जामनेर येथे उत्साहात पार पडली.
१४, १७ व १९ वर्षे वयोगटांतील मुला-मुलींसाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एकूण १०४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला चुरस निर्माण केली.
या स्पर्धेमध्ये इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहा खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत जिल्हास्तरासाठी निवड मिळवली.
🔹 *१९ वर्षे मुले गट:*
भावेश जगन्नाथ कापडे (१२ वी विज्ञान)
संस्कार रमेश महाजन (१२ वी विज्ञान)
अएफाज जावीद बेग (११ वी विज्ञान)
🔹 *१९ वर्षे मुली गट:*
साक्षी मनोज माळी (१२ वी विज्ञान)
साक्षी राजेंद्र तेली (१२ वी विज्ञान)
प्रतीक्षा किरण वाघ (१२ वी विज्ञान)
त्यांच्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, मुख्याध्यापक एस.आर. चव्हाण, उपमुख्याध्यापक एस. एन. चवरे, उपप्राचार्य प्रा. के. एन. मराठे, पर्यवेक्षक प्रा.के डी निमगडे पर्यवेक्षक प्रा.जी जी अत्तरदे, क्रीडा विभाग प्रमुख जी सी पाटील, बी पी बेनाडे, गजानन कचरे यांच्यासह संपूर्ण शिक्षकवृंदाने अभिनंदन केले.
या खेळाडूंना प्रा.समीर घोडेस्वार यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लॉर्ड गणेशा स्कूल संचालक दीपक पाटील, प्राचार्य धनंजय सिंग, तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान, अंजुमन हायस्कूलचे मुख्याध्यापक शेख जलाल, लॉर्ड गणेशा स्कूलची क्रीडा शिक्षक नरेंद्र पाटील, आनंद मोरे , तुषार पाटील(अ चि पाटील विद्या.रोटवद), जहीर खान (पोदार जीनियस स्कूल), राजेंद्र चौधरी(सावित्रीबाई फुले, पहुर), विनोद नाईक (सहकार विद्या.मंदिर,फत्तेपुर ) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सहा खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड ही संकुलासाठी गौरवाची बाब ठरली आहे.
——————————–
Leave a Reply