जामनेर(प्रल्हाद सोनवणे)१ मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६० साली या दिवशी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी माणसाच्या अस्मितेला, संस्कृतीला आणि भाषेला स्वतंत्र राज्याचा हक्क मिळाला. हा दिवस केवळ एका प्रशासकीय बदलाचा नाही, तर लाखो मराठी जनतेच्या संघर्षाचे, त्यागाचे आणि एकतेचे प्रतीक आहे. जामनेर तहसील कार्यालयात तहसीलदार श्री नानासाहेब आगळे यांच्या हस्ते आज सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर जामनेर तहसील कार्यालयात १०० दिवस कार्यक्रमांतर्गत अभ्यागत कक्ष,आवक जावक कक्ष,QR code वाचनालयाचे मा साधनाताई गिरीश महाजन नगराध्यक्ष नगरपरिषद जामनेर यांचे शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मा मुख्यमंत्री महोदय यांचे निर्देशानुसार सुरू असणाऱ्या १०० दिवसांचा कार्यक्रम अंतर्गत दिलेल्या ७ कलमी कार्यक्रम अनुषंगाने आज जामनेर तहसील कार्यालयात अद्ययावत आवक जावक कक्ष व योजनादूत कक्ष तसेच अद्ययावत अभ्यागत कक्ष व त्या अंतर्गत असणारे QR code वाचनालयाचे उद्घाटन मा साधनाताई गिरीश महाजन माजी नगराध्यक्ष नगरपरिषद जामनेर यांचे शुभ हस्ते आज करण्यात आले.

oplus_2
अद्ययावत अभ्यागत कक्ष यात ग्रामीण भागातून तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची सुसज्ज व्यवस्था, अभ्यागत कक्षातील QR code वाचनालय,योजनापर माहितीसाठीचा digital platform ,तसेच कार्यालयाचे आवारातील भिंतीवर जमीन व्यवहार निती अनुषंगाने गोष्टीरुप कायद्याचे माहिती फ्रेम लावण्यात आलेल्या आहेत.गावनिहाय तलाठी भेटीचे वेळापत्रक देखील QR code स्वरूपात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

oplus_2
सदरचा उपक्रमामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या अभ्यागत यांच्यासाठी शासकीय कामकाज अधिक गतिमान व सोयीस्कर होणार आहे.सदरची संकल्पना जळगाव जिल्ह्याचे मा जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद ,मा अपर जिल्हाधिकारी जळगाव श्री अंकुश पिनाटे,मा उपविभागीय अधिकारी जळगाव भाग जळगाव श्री विनय गोसावी यांचे मार्गदर्शनाने पूर्ण करण्यात आलेली आहे.
Leave a Reply