जामनेर (प्रतिनिधी)लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. महाविद्यालयाची तर गोष्टच काही औरच असते. याचा प्रत्यय रविवारी न्यून्यू इंग्लिश स्कूल च्या 1988 च्या बॅचचे विद्यार्थी तब्बल 37 वर्षानंतर च्या काळातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला. विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी या वेळी एकत्र आले.
धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेला आहे; पण महाविद्यालयाची आठवण कायम येत असल्याचे प्रत्येकाच्या तोंडून निघाले. माजी मुख्याध्यापक श्री नाना लामखिळे सर यांच्या हस्ते छडीचा प्रसाद हातावर घेत विद्यार्थ्यांनी त्यांचे आनंदाने आशीर्वाद घेतले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांच्या काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला न्यू इंग्लिश स्कूल च्या 1988 च्या बॅचचे विद्यार्थी तब्बल 37 वर्षानंतर एकत्र येऊन स्नेह मेळावा पार पडला. माजी मुख्याध्यापक नाना लामखडे सर यांच्या उपस्थितीत सर्व माजी विद्यार्थी यामध्ये राजकीय नेत्यांपासून, डॉक्टर , इंजिनियर, ,वकील ,उद्योजक शिक्षक अनेक स्तरातील माजी विद्यार्थी जमले होते . दहावीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या गमती जमती विद्यार्थ्यांनी पूर्ण दिवस घालवला.गारखेडा परिसरातील वाघुर बॅक वॉटर येथे बॅक वुड रिसॉर्टवर निसर्गरम्य वातावरणाचा तसेच जल सफारीचा आनंद घेतला. याप्रसंगी जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांनी आपल्या शालेय जीवनातील अनेक मित्र भेटल्याने आनंद व्यक्त करीत आपल्या आठवणीना उजाळा दिला.यामध्ये जितेंद्र रमेश पाटील , महेंद्र बाविस्कर , डॉक्टर राहुल महाजन , डॉक्टर धर्मेंद्र पाटील , डॉक्टर जितेंद्र कोल्हे , डॉक्टर प्रशांत देशमुख , विवेक पाटील ,दीपक आगीवाल पांडुरंग महाजन, सुनील झांबरे , संजय वानखेडे ,संजय पाटील , प्रमोद चौधरी , जयश्री पाटील , अर्चना देशमुख राजीव जावळे , सुरेखा बोहरा, हर्षल संत यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. गारखेडा परिसरातील वाघुर बॅक वॉटर येथे बॅक वुड रिसॉर्टवर निसर्गरम्य वातावरणाचा तसेच जल सफारीचा आनंद घेतला. याप्रसंगी जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांनी आपल्या शालेय जीवनातील अनेक मित्र भेटल्याने आनंद व्यक्त करीत आपल्या आठवणीना उजाळा दिला
Leave a Reply