जामनेर(प्रतिनिधी)जामनेर शहरातील ज्ञानगंगा माध्य. विद्यालयातील विद्यार्थ्यांची त्यांच्याच गावातील ग्रामपंचायतींना शैक्षणिक क्षेत्रभेटीचा अनोखा उपक्रम योगेश बावस्कर सर यांच्याकडून राबविण्यात आला आपल्याच गावातील ग्रामपंचायतींना क्षेत्रभेट घेवून लोकशाही प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागाचा अनुभव विदयार्थी घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांनी आबिलहोळ, पळसखेडे, वाकी, तळेगाव येथील ग्रामपंचायतींच्या कामकाजाविषयी सखोल माहिती जाणून घेवून तेथील कामकाजाची पद्धत, ग्रामपंचायतीचे अधिकार आणि कर्तव्ये, तसेच गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीचे कार्य, ग्रामसभा, उत्पन्नाचे साधन, याबद्दल माहिती मिळवली. सरपंच ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांची, योजनांची माहिती दिली आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देवून शंकांचे निरासन केले.योगेश बावस्कर सर यांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या कार्याबद्दल जागरूकता निर्माण होवून त्यांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रेरणा मिळाली. आपल्या गावातील विद्यार्थ्यांना आपल्या गावाच्या विकासात सक्रिय योगदान देण्याची संधी मिळाल्याबद्दल योगेश बावस्कर सरांचे ग्रामपंचायत मार्फत कौतुक करण्यात येवून सदर उपक्रमाचे स्वागत करण्यत आले.सदर उपक्रमाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा कृतियुक्त अनुभव घेतला, जो त्यांच्या भविष्यात निश्चितच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन प्राचार्य श्री.आर.जे. सोनवणे सर यांनी वाकी येथील क्षेत्रभेटीच्या वेळेस केले. प्राचार्य आर.जे. सोनवणे सर, अशोक पालवे साहेब, सरपंच,भिका तायडे,ललीत लामखेडे,राजेंद्र खरे, सौ. आरतीताई कोळी, दिलीप चव्हाण, प्रशांत वाघ, ग्रामसेवक योगेश पालवे, सौ. उज्वलामहाजन,व्ही. एम. पवार, चिंतामण राठोड, पालक शत्रुघ्न चव्हाण, भानुदास भाऊ चव्हाण, बाळूभाऊ चव्हाण, यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सदर उपक्रमासाठी विजय कोळी, विनय खोंडे,विलास पाटील,अनिल देशमुख,रुपेश क्षिरसागर, सौ स्नेहल पाटील, सौ. वंदना उंबरकर, सौ. मनीषा भारंबे सौ. रोहिणी चौधरी यांचे सहकार्य लाभले.
Leave a Reply