जामनेर (प्रतिनिधी)आत्मनिर्भर भारताचे प्रणेते, भारताला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणारे विश्वगुरू देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांना ७५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे इ ५वी (पूर्वतयारी स्थर ),इ. ६वी ते इ.८वी (पूर्व माध्यमिक स्तर), इ.९वी ते १२वी (माध्यमिक स्तर) या गटातून निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी जामनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री विष्णूजी काळे साहेब, श्री राठोड साहेब,केंद्रप्रमुख श्री विकासजी वराडे, विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र सोनवणे, तंत्रस्नेही श्री जाधव सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असंख्य विद्यार्थ्यांसह उपस्थित होते.त्यावेळी विद्यालयातील कुमारी वैष्णवी ईश्वर बेलदार या विद्यार्थिनीने आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचे काढलेले “स्केच” फोटो विद्यालयाला भेट देण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र सोनवणे यांनी कुमारी वैष्णवी बेलदार व निबंध व चित्रकला स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व कला शिक्षकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले व आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना संस्थेचे अध्यक्ष नामदार गिरीश भाऊ महाजन साहेब (जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाराष्ट्र राज्य), व सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभकामना दिल्या.
त्यावेळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विष्णूजी काळे साहेब यांनी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत आठवा राष्ट्रीय पोषण महा २०२५ निमित्त “एक पेड मा के नाम”आहार पद्धती,पोषण भी पढाई भी याबाबत केलेल्या कामाचे विद्यालयाचे कौतुक केले. प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन विलास पाटील व आभार विद्यालयाचे उपशिक्षिका मनीषा भारंबे यांनी मांनलेत
*देशाचे यशस्वी प्रधानमंत्री यांना ७५ व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा* !💐💐💐
Leave a Reply