जामनेर (प्रतिनिधी): ज्ञानगंगा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, जामनेर येथील उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले योगेश रामधन बावस्कर यांना महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव अंतर्गत घेण्यात आलेल्या शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत सामाजिक शास्त्र विषय गट ६ वी ते ८ यात तालुकास्तरीय विभागातून प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल त्यांचा शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर तर्फे स्मृती चिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपअभियंता भाजपचे जेष्ठ नेते जे. के. चव्हाण तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंदिराबाई ललवाणी जामनेर पूरा शाळेचे सचिव किशोर महाजन, जळगाव जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे, गटशिक्षणाधिकारी राम लोहार, शिक्षा विस्ताराधिकारी विष्णू काळे, प्रकाश कुमावत, केंद्रप्रमुख सुरेश अंभोरे, बाबुराव धुंदाचे भानुदास तायडे, शुभांगी पाटील, संगीता पालवे, संदीप पाटील, विकास कराते, किरण पाटील, विजय गायकवाड, नवल राजपूत, ज्ञानेश्वर पाटील, चंद्रक विसपुते, रानोटकर सर, नाईक सर मुख्याध्यापक संधाचे आर. ए. पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी इयत्ता चौथीसाठीची जेटीएस परीक्षेतील 45 गुणवंत विद्यार्थी 26 गुणवंत शिक्षक, 10 सुलभक टीम सदस्य यांचा सुद्धा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख संदीप पाटील यांनी केले, प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी राम लोहार यांनी मांडले तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू काळे यांनी मानलेत.
Leave a Reply