ज्ञानगंगा कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान व वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल

जामनेर (प्रतिनिधी)जामनेर येथील श्री. ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय,जामनेर तालुका जामनेर जिल्हा जळगाव या महाविद्यालयाचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निकाल १०० % लागला असून कु.भोंबे धनश्री विकास ही विद्यार्थीनी ७१.६७% मिळून विद्यालयातून प्रथम आलीआहे. तर कु.कुमुद रविप्रकाश जयकारे६०.८३ % मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.तर कु.हर्षल नरेंद्र पाटील हा ६०.६७टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
*वाणिज्य शाखेचा निकाल १००%* निकाल लागला असून कु.कोमल कमलाकर मुळे ही विद्यार्थीनी ७६.३३% मिळून वाणिज्य शाखेत प्रथम आली आहे. द्वितीय क्रमांक सोनाली गोपाळ गवळी ही ७४.६७%मिळून उत्तीर्ण झाली. तर तृतीय क्रमांकाने कु.जयश्री धनराज शेजोळ ही ६८% मिळून उत्तीर्ण झाली.
*🔹कला शाखेचा निकाल ८९.३९ %* लागला असून कु. धानोइ पायल रणजित ही विद्यार्थीनी७०.३३% मिळवून कला शाखेतून विद्यालयात प्रथम आलेली आहे .तसेच द्वितीय क्रमांकाने कु.थाटे प्रेम विनोद ६६.६७% मिळवून उत्तीर्ण झाला. तर तृतीय क्रमांकाने कु. चिमनकर साक्षी रवी ही ६५.१७ %गुण मिळवून उत्तीर्ण झाली. *एकत्रित सर्व शाखांचा ९५.८३टक्के निकाल लागलेला आहे.*
🔸विद्यालयातून प्रथम आलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय नामदार श्री गिरीषभाऊ महाजन साहेब ( जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाराष्ट्र राज्य), संस्थेच्या सचिव सौ साधनाताई महाजन (मा. नगराध्यक्ष न.पा. जामनेर, संस्थेचे संचालक एडवोकेट शिवाजी सोनार साहेब, श्री के.बी.माळी साहेब व विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र सोनवणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले त्यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *