जामनेर (बापू खोडके)आज जि. प.केंद्रशाळा वाकोद तालुका जामनेर या ठिकाणी आषाढी एकादशीचे औचित्य साधत ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सर्वप्रथम वाकोद गावातील भजनी मंडळाने दिंडीचे पूजन केले. त्यानंतर गावकरी मंडळी व भजनी मंडळ यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर माजी जि.प.सदस्य अमित भाऊ देशमुख व वाकोद केंद्राचे केंद्रप्रमुख हेमंत पाटील यांच्या हस्ते शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात बाळ चिमुकल्यांच्या दिंडी सोहळ्याचे भजनाच्या तालावर सादरीकरण करण्यात आले. शाळेच्या या दिंडी सोहळ्यात गावकरी, महिला भगिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला सर्वांनी भजन, पावली, फुगड्या खेळत आनंद साजरा केला. शेवटी वाकोद गावचे सरपंच दीपक गायकवाड व जळगाव उपशिक्षणाधिकारी श्री सरोदे साहेब यांनी विठ्ठलाच्या आरतीने दिंडी सोहळ्याची सांगता केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील ग्रामस्थ पोलीस पाटील संतोष देठे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड, शिक्षण प्रेमी विनोद भाऊ राऊत, निलेशभाऊ पाटील सर्व समिती सदस्य शाळेतील शिक्षक नेमाडे मॅडम, पालवे मॅडम, वेंदे मॅडम,चौधरी मॅडम, बैरागी मॅडम, पवार मॅडम, संतोष पाटील सर, गायकवाड सर, चंद्रशेखर पाटील सर, आघाडे सर, काटकर सर सर्वांनी प्रयत्न केले.
Leave a Reply