जामनेर(प्रतिनिधी) दि. १२ जून २०२५: शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) जळगाव व पंचायत समिती जामनेर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २ जूनपासून सुरू झालेल्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण शिबिराचा समारोप आज उत्साहात झाला.
जामनेर व बोदवड तालुक्यातील एकूण १७३ शिक्षकांनी सहभाग घेत प्रशिक्षणपूर्व ५० गुण, लेखी चाचणी ५० गुण, व प्रशिक्षणोत्तर शैक्षणिक संशोधन ५० गुण अशा एकूण २०० गुणांच्या मूल्यांकनावर आधारित वेतनश्रेणी निश्चिती प्रक्रियेत भाग घेतला.
प्रत्येक प्रशिक्षणार्थीने ५० गुणांची लेखी चाचणी दिली असून, पुढील ४० दिवसांत शैक्षणिक संशोधन सादर करायचे आहे. यामुळे शिक्षकांच्या वाढीव वेतनाच्या प्रक्रियेस गती मिळणार आहे.
मार्गदर्शन व प्रमुख उपस्थिती
समारोपप्रसंगी ललवाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.आर. चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
लक्ष्मण मोहने, उल्हास पाटील, इब्राहिम शेख यांची मनोगते झाली दीपक माळी यांनी सूत्रसंचालन तर किशोर चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले.
या प्रशिक्षण शिबिरास डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे,
डॉ. सी.डी. साळुंखे, डॉ. जगन्नाथ दरंदले, डॉ. प्रतिभा भावसार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन यांचे सहकार्य लाभले.
उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांनीही वेळोवेळी उपस्थित राहून प्रेरणादायी संबोधन केले.
प्रभावी सुलभकांची टीम
या प्रशिक्षणाच्या यशस्वीतामध्ये १६ सुलभक शिक्षकांचा मोलाचा सहभाग होता.
पंकज रानोटकर, रणजीत जगताप, सुदाम चव्हाण, मंगला जवळकर, पंडित बाविस्कर, रंजना कोळी, कैलास महाजन, सरला महाले, राजेश सांगोरे, अश्विनी पाटील, सविता वाघुळदे, समीर घोडेस्वार, शुभांगी चौधरी, आकाश तायडे, शंकर भामेरे यांचे योगदान उल्लेखनीय राहिले.
समारोपप्रसंगी शिक्षकांनी सुलभक व मार्गदर्शकांचे स्नेहवस्त्र, पुस्तक व आंब्याचे रोप भेट देऊन यथोचित सत्कार केला.
————————————
Leave a Reply