जामनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच पंचायत समिती जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर तालुकास्तरीय कुस्ती ( मुले/ मुली) स्पर्धा ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय जामनेर येथे आज संपन्न झाल्या त्यात आपल्या कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी १)कुमार कुणाल सतीश बावस्कर इ.११वी कला ६१ किलो वजन गटात प्रथम
२) कुमार प्रशांत समाधान कुमावंत इ.११वी कला ५७ किलो वजन गटात प्रथम अशा प्रकारे यश प्राप्त केले त्या बद्दल महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ आर एस खडायते सर कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा.श्री भदाणे सर तसेच क्रीडा प्रेमी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक परिवार यांनी खेळांडुचे आभिनंद करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या छोट्याशा यशा साठी वरिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक श्री डॉ नवनीत आसी व क्रीडा प्रशिक्षक देवा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशासाठी हनुमान व्यायाम शाळा बजरंगपुरा पुरा जामनेर येथील वस्ताद. दयाराम शिंदे कोंडू पैलवान, मार्गदर्शक जयेश मराठे, बबलू परवते, राहुल लोणारी यांचे सहकार्य लाभले…
Leave a Reply