जामनेर (प्रतिनिधी)जामनेर ता.जामनेर येथे मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेची कार्यकारणी गठीत करण्यात आली. याप्रसंगी वाचन चळवळीचा प्रचार प्रसार करण्याचा सर्वानुमती निर्णय घेण्यात आला. ‘बांडा हंगाम’ कार कवी किशोर काळे यांनी भविष्यातील साहित्य परिषदेने असेच विविध उपक्रम राबवावे.तसेच प्रत्येकाने वाचन लेखन चळवळीत कोणताही न्यूनगंड न ठेवता काम करावे असे आवाहन केले.साहित्याचे प्रकार व साहित्य क्षेत्रातील संधी याविषयी सुनील चौधरी सर यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सुनील चौधरी,खादगाव लिखित ‘गीतजागर’ व गजानन माळी तळेगाव लिखित ‘वर्षानंद’ या काव्यसंग्रहाचे वाटप करून सर्व सदस्यांचे स्वागत करण्यात आले.सर्व सदस्यांनी साहित्य विषयक आपले अनुभव,भावना विचार व्यक्त केले. भविष्यात कवी संमेलन, कविता कार्यलेखन शाळा, व इतर साहित्यप्रकार विषयक लेखन कार्यशाळा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे गठित करण्यात आली. शिवाजी आहेर सर (तालुका अध्यक्ष), दीपक वारंगणे सर (सचिव), परिषदेचे मार्गदर्शक:- कवी किशोर काळे सर, कवी ईश्वर दादा पाटील, कवी सुनील चौधरी सर, गंगाराम नरवाडे सर (कार्याध्यक्ष), स्नेहल कानडे मॅडम (उपाध्यक्ष), डॉ.बाजीराव पाटील सर (प्रवक्ते), रमाई लोखंडे मॅडम (सहसचिव), समाधान पांढरे सर (सहकार्याध्यक्ष), विनोद सुरवाडे सर (संपर्कप्रमुख), गजाननभाऊ माळी (प्रसिद्धी प्रमुख), निलेश भाऊ सुरवाडे (प्रसिद्धीप्रमुख), गजानन पाटील सर (कोषाध्यक्ष) गोपाल पाटील सर (सहकोषाध्यक्ष), भास्कर पाटील सर (समन्वयक), आनंदा वारंगणे सर (सहसमन्वयक), जयश्रीताई पाटील शेळके मॅडम (गाथा अभ्यासक),सुवर्णा आव्हाढ पाटील मॅडम, रेखा ताम्हणे मॅडम (महिला संघटक), सविता वाघुळदे मॅडम (महिला संघटक),मुकुंदा वारंगणे सर (संघटक) कृष्णा तपोने सर (संघटक) नितीन पाटील सर (चरित्र अभ्यासक), राहुल सपकाळ सर (चरित्र अभ्यासक), समाधान हुंबड सर (संत साहित्याचे अभ्यासक), नंदकिशोर आहेर सर (नाट्य विभाग) ,दीपक बोरसे (नाट्य विभाग) चंद्रशेखर आहेर (नाट्य विभाग) प्रवीण बोराडे (चरित्र अभ्यासक) महादेव बोरसे (संत साहित्याचे अभ्यासक)
अश्या पद्धतीने सर्वानुमते कार्यकारिणी तयार करण्यात आली. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक योगेश पाटील सर, तालुकाध्यक्ष दीपक ढोनी सर उपस्थित होते. तर बैठक व्यवस्थेसाठी गरुड कोचिंग क्लासेस चे संचालक संदीप उघडे सर यांनी अनमोल सहकार्य केले.
Leave a Reply