जामनेर-(प्रतिनिधी)येथे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, अपर जिल्हा दंडाधिकारी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री. गजेंद्र पाटोळे, अधीक्षक अभियंता जलसंपदा विभाग श्री. भदाणे, तसेच तहसीलदार जामनेर श्री. नानासाहेब आगळे यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वाच्या विषयांवर आढावा बैठक पार पडली.2020 शेततळ्यांचे कामकाज – आतापर्यंत झालेल्या कामांची समीक्षा. शेतकऱ्यांचे हमीपत्र – अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सामूहिक गट तयार करण्यासंदर्भात चर्चा. सहकाराच्या भूमिकेवर भर – जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी सहकाराची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. सर्व सरपंचांनी सहकारी तत्वावर पुढील दोन महिन्यांत विविध योजनांच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी काम करावे,
असे निर्देश दिले.पुनर्वसित गावांचा आढावा पुनर्वसन प्रक्रिया – सहा पुनर्वसित गावांच्या पुनर्वसन नियोजनावर सविस्तर चर्चा. मुख्य अडचणी व उपाययोजना – स्वामित्व योजनेअंतर्गत सीमांकन व सलोखा योजनेअंतर्गत प्रस्ताव शासनास सादर करण्याचे नियोजन निश्चित. बैठकीत विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलण्यावर भर देण्यात आला, ज्यामुळे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण आणि पुनर्वसित गावांचा सर्वांगीण विकास साधला जाईल.
Leave a Reply