जामनेर (प्रतिनिधी)जी.डी.एम.कला के.आर.एन.वाणिज्य व एम.डी.विज्ञान महाविद्यालयात शनिवार दि.०८/०२/२०२५ रोजी विज्ञान विभागातर्फे”State Level Students Seminar -2024-25″आयोजित करण्यात आले.सेमिनारचे उद्धघाटन सकाळी ठीक १० वा.मान्यवरांच्या हस्ते झाले. मागील २० वर्षा पासून सदर सेमिनारचे आयोजन करण्यात येत आहे.वरील सेमिनार मध्ये विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयातून 24 स्पर्धकांनी भाग नोंदवला. कार्यक्रमाचे उद्घाटक-डॉ.उदय जगताप (प्राचार्य धरणगाव महाविद्यालय), प्रमुख अतिथी-श्री जितेंद्र बाबुराव पाटील(अध्यक्ष, जा.ता.ए.सो. जामनेर) श्री जितेंद्र रमेश पाटील(सचिव,जा.ता.ए.सो. जामनेर),
श्री दीपक बंडू पाटील( सिनेट सदस्य केबीसी एन. एम. यू.जळगाव) जज-डॉ. व्ही.व्ही. गीते (केबीसी एन.एम.यू. जळगाव), डॉ. मनोज चोपडा (एम.जे. कॉलेज जळगाव),
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर.एस.खडायते,
सायन्स फोरम चे अध्यक्ष प्रा.एम.टी चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
बक्षीस वितरणाच्या दुसऱ्या सत्रात सेमिनार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस.खडायते तसेच परीक्षक म्हणून डॉ.व्ही.व्ही. गीते व डॉ. मनोज चोपडा, प्रा.एम.टी.चौधरी, डॉ.आर.एच.बारी हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना प्रथम द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
Theme-I पहिले बक्षीस १) बडगुजर दर्शना कैलास झेड.बी.पाटील कॉलेज धुळे, दुसरे बक्षीस २) नेहा भगवान पर्वते, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय बोदवड,
Theme-II पहिले बक्षीस १) अश्विनी भगवान महाजन, व्ही.एस.नाईक कॉलेज रावेर,
दुसरे बक्षीस २) पाटील कुणाल संजय, झेड.बी. पाटील कॉलेज धुळे, Trophy winner team-म्हणून झेड.बी. पाटील कॉलेज धुळे यांना घोषित करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी परीक्षक डॉ. गीते आणि डॉ. चोपडा यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले आणि प्राचार्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले तसेच स्पर्धक व संघ व्यवस्थापकांनी आपली मनोगते व्यक्त केली. गौरी, दिपाली ,अनिता व श्वेता या विज्ञान विभागाच्या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केलं, वरील सेमिनार कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. डी.एस.पाटील, प्रा.डॉ.किरण पाटील, नैक समन्वयक डॉ. अरविंद राऊत,डॉ.रवींद्र वाघ तसेच विज्ञान विभागातील डॉ. वर्षा मानवतकर, डॉ.उज्वला गावित, प्रा.एस.आर.ठोसरे, प्रा.आय.एम.जाधव, राजेश शर्मा, प्रवीण पद्मे, डॉ. राहुल नवघरे, प्रा. कैलास सोनवणे, प्रा. स्वप्निल सोनवणे, प्रा.ममता पाटील, तसेच इतर प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सेमिनार कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Leave a Reply