जामनेर (प्रतिनिधी)जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या सूचनेनुसार प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कार्यक्रमांतर्गत जामनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व उपकेंद्रे स्तरावर १००८ गर्भवती महिलांची तपासणी विशेष शिबिरातर्गत करण्यात आली.यापैकी ६७४ पहिल्या तिमाहीतील व ३३४ दुसऱ्या तिमाहीतील गरोदर माता होत्या.सदर गरोदर मातांची मोफत रक्तदाब, रक्तातील साखर, एचआयव्हि, ओजीटीटी इत्यादी सह २२ प्रकारच्या तपासणी चाचण्या करण्यात आल्या.
तसेच मोफत १६७ लाभार्थींना सोनोग्राफीसाठी संदर्भित करण्यात आले.
तीव्र रक्तक्षय असलेल्या एकूण ३ मातांना आयर्न सुक्रोज लावून उपचार करण्यात आला.
शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.दानिश खान, डॉ संदीप कुमावत, डॉ. मोहित जोहरे, डॉ.कोमल देसले, डॉ किरण पाटील, डॉ शारिक कादरी, डॉ संदीप जाधव, डॉ सागर पाटील, डॉ. रोहिणी गरुड तसेच सर्व समुदाय वैद्यकिय अधिकारी,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहायिका,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
गरोदर मातांची वेळेत तपासणी करून प्रसुतीच्या वेळी होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी प्रधान मंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरवात करण्यात आलेली आहे.गरोदर मातांनी शासकीय संस्थेत कमीत कमी सहा तपासण्या करून घेणे आवश्यक आहे.
…..डॉ.राजेश सोनवणे , तालुका वैद्यकीय अधिकारी जामनेर.
Leave a Reply