जामनेर (प्रतिनिधी )तालुक्यातील टाकळी खुर्द येथे नुकतीच उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गणेश घ्यार यांनी कारभार पहिला यावेळी सौ.मीनाक्षी शरद मोरे यांचा एकमेव अर्ज आला त्यामुळे ग्रामपंचायत च्या सभेचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच जितेंद्र प्रल्हाद माळी यांनी सौ.मीनाक्षी शरद मोरे यांना बिनविरोध उपसरपंचपदी घोषित केले यावेळी सभेचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच जितेंद्र माळी व माजी उपसरपंच विजय चवरे तसेच ग्रामपंचायत सदस्य उमेश पाटील,अमोल महाजन,सौ सुरेखा रमेश महाजन,नम्रता दीपक बावस्कर परिवर्तन पॅनलचे ज्येष्ठ कार्यकर्ते गुरुवर्य रमेश चवरे सर, सुनील जंजाळ सर ,विनोद माळी,आनंद महाजन,अनदा सोन्ने,सीताराम नेरकर,युवराज मोरे व समस्त गावकरी मंडळी यांनी फटाक्याच्या आतिषबाजीने व जल्लोषाने सौ मीनाक्षी शरद मोरे यांना उपसरपंच पदी विराजमान केले
Leave a Reply