जामनेर तालुक्यातील एकूण ८ शिवरस्त्यांनी घेतला मोकळा श्वास- पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम सुरू

जामनेर (प्रतिनिधी)मा.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील दि 31/12/2024 रोजीच्या परीपत्रकानुसार मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजने अंतर्गत बारमाही वापरता येण्यासारखे कायमस्वरुपी रस्ते तयार करणे करीता कालबध्द कार्यक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. जामनेर तालुक्यातील एकुण 269 शेतरस्ते/पानंद/शिवरस्ते असुन सदर रस्ता पैकी 37 रस्ते हे अतिक्रमीत रस्ते आहेत

त्यापैकी एकुण 08 अतिक्रमीत शेतरस्ते/पानंद/शिवरस्ते मा.उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी व तहसीलदार जामनेर श्री नानासाहेब आगळे यांचे मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी संबंधित गावचे ग्राम विकास अधिकारी,सरपंच,पोलीस पाटील तसेच शेतकरी ग्रामस्थ यांचे मदतीने सदरचे शिव/ पानंद /शेतरस्ते अतिक्रमण काढण्यात येऊन सदरचे पानंद रस्ते शेतकरी बांधवांसाठी खुला करण्यात आलेला आहे.

जामनेर तालुक्यातील अतिक्रमण मोकळे करण्यात आलेल्या रस्यारीची माहीती खालील प्रमाणे आहे.
1 सोनारी सोनारी-मालदाभाडी शिवरस्ता 500 मी. 80 शेतकरी 2 मादणी मादणी-किन्ही शिवरस्ता 2.5 किमी 70 शेतकरी
3 वाकडी कर्णफाटा-वाकडी शिवरस्ता 1.5 किमी 30 शेतकरी 4 गारखेडा खु ग.क्र.171 ते 188 गारखेडा शेतरस्ता 1 किमी 20 शेतकरी  महुखेडा 5 सुनसगाव खु सुनसगाव खु ते भिलखेडा शिवरस्ता 1 किमी 40 शेतकरी 6 चिलगाव चिलगाव फाटा ते पळसखेडा गाडीरस्ता 1 किमी 70 शेतकरी 7 बिलवाडी बिलवाडी शेतरस्ता शेतरस्ता 1 किमी 80 शेतकरी 8 हिवरखेडा हिवरखेडा दिगर ते पिंपळगाव पाणंदरस्ता 2 किमी 140 शेतकरी अतिक्रमण मोकळे केलेल्या रस्त्याचे एकूण अंतर हे अंदाजे 11 कि मी इतके आहे.

सदर शिव/ पानंद /शेतरस्ते रस्त्याचे अतिक्रमण काढल्याने त्या भागातील किमान 530 शेतकरी यांना सदर रस्याहेचा फायदा होणार आहे. सदरच्या मोहिमेतून सर्व शिव/ पानंद /शेत रस्त्याच्या हद्दी निश्चित करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतरस्ते तयार करण्यासाठी रोजगार हमी योजना व ग्रामविकास विभागाचे योजनेतून कामकाज करण्यात येणार आहे. सदर खुले करण्यात आलेल्या शेतरस्त्यांची नोंदी गावचे नकाशावर करणे बाबत शासन स्तरावरून नियोजन करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये देण्यात येणाऱ्या आदेशात देखील शेत रस्त्याचा उल्लेख करणे बाबत निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले आहेत. सदर शिवरस्ता खुला केल्याने परिसरातील नागरिक व शेतकरी बांधवानी शासनाच्या या योजनेबाबत समाधान व्यक्त केले आहे. सदरची अतिक्रमण खुले करण्याची कार्यवाही मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी,ग्रामविस्तार अधिकारी,सरपंच व पोलीस पाटील व शेतकरी बांधव यांचे मदतीने लोकसहभागातून खुला करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *