जामनेर -(प्रतिनिधी )- जामनेर तालुका साहित्य व सांस्कृतिक मंडळा पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये 51 हजाराचा धनादेश देण्यात आला. साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमृत यात्री डी. डी. पाटील यांच्या हस्ते राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याकडे त्यांनी सुपूर्त केला.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष डी. डी . पाटील मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला असून त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता प्रत्येकाने मदतीचा हात दिला पाहीजे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीष महाजन हे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र काम करीत आहे. जी. एम. फाऊंडेशन च्या माध्यमातून शासनाकडून निधी मिळवून देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असते. म्हणून अशा संकट काळी त्यांना बळ देण्यासाठी भक्कम पणे त्यांच्या पाठिशी उभे रहावे या भुमिकेतून त्यांनी साहित्य मंडळामार्फत ही मदत दिली असेही ते म्हणाले.
Leave a Reply