जामनेर(प्रतिनिधी)जामनेर येथिल जामनेर तालुका वकील संघाची बैठक बारचे ज्येष्ठ वकील सदस्य ॲड. ए. पी. डोल्हारे, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात बारचे माझी अध्यक्ष अँड बी. एम. चौधरी यांनी वकील संघाचे वतीने अँड. कमालकर बारी यांचे अध्यक्षपदासाठी नाव सुचविले तद्नंतर सर्वानुमते त्यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. तर सचिव पदी अँड. दिगंबर गोतमारे यांची तसेच खजिनदार पदी अँड शिल्पा साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी बैठकीचे सूत्र संचालन अँड एस. आर. पाटील यांनी केले. ज्येष्ठ वकिल सदस्य अँड एस.एम.साठे, अँड.एस.एम.सोनार, अँड. ए . डी.सारस्वत, अँड. पी.डी.पाटील, अँड आर.बी.पाटील, अँड. बी.एन.बाविस्कर, अँड पि.के.सोनार, अँड .पी.एन.पाटील,अँड. डी.बी.बोरसे, अँड.एन.टी.चौधरी यांनी निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच अँड. पी.एन.देशमुख, अँड . अँड. डी. जी. पारळकर, अँड. व्हि. जे. धनगर, अँड सुनील पाटील, अँड के. बी. राजपूत, अँड डी. ई. वानखेडे, अँड प्रसन्न पाटील, अँड डी. आर. सूर्यवंशी, अँड रफिक शेख, अँड. किशोर दुबे, अँड सोनाली सुरवाडे, अँड. डी. एस. राऊत तसेच वकिल संघाच्या सर्व सदस्य यांनी यांनी अभिनंदन केले आहे.जामनेर वकील संघात निवडणुक न होता खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध निवड केली जाते ही परंपरा आजही कायम आहे.
Leave a Reply