जामनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक (जुक्टो) संघटनेतर्फे विविध मागण्याचे निवेदन सादर:

जामनेर(प्रतिनिधी)राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने तथा त्यावर शासन वारंवार आश्वासन देऊनही आश्वासित मागण्यांवर निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने विविध मागण्यांचे निवेदन जामनेर तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी नानासाहेब आगळे यांना जामनेर तालुका जुक्टो संघटनेचे सचिव प्रा.सोनूसिंग पाटील तथा पदाधिकारी यांनी दिले.
*अशा आहेत मागण्या:*
१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षणात प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ देण्यात यावी, निवृत्तीचे वय ६० वर्ष करावे, १०,२०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, डी सी पी एस /एन पी एस योजना लागू केलेल्या शिक्षकांना हिशोब व देय रक्कम देण्यात यावी आदी. विविध मागण्या आहेत.
याप्रसंगी सहसचिव प्रा.समीर घोडेस्वार, प्रा.जे.आर पाटील, प्रा.राजेश खडके, प्रा. रवींद्र शेले, प्रा.कोमलसिंग परिहार, प्रा.संजय क्षीरसागर , प्रा.सुमित काबरे, प्रा.मंगेश पाटील, महिला प्रतिनिधी प्रा. सौ.राजश्री पाटील, प्रा.सौ.सरला महाले, प्रा.सौ.मनीषा घडेकर, प्रा.विजेता परदेशी, आदी.जामनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे बंधू-भगिनी उपस्थित होते.
जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे (जुक्टो)अध्यक्ष प्रा.नंदन वळींकार, उपाध्यक्ष डॉ.अतुल इंगळे, कार्याध्यक्ष प्रा.शैलेश राणे, सचिव प्रा.सुनील सोनार, तालुका सल्लागार प्रा.किरण कुलकर्णी, तालुका अध्यक्ष प्रा.सुरेश पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *