जामनेरात माजी नगसेवक यांच्या घरात २५ लाखांची घरफोडी: सिसीटीव्हीमध्ये चोरटे कैद.. पोलीस निरीक्षक कासार यांचे जनतेला सावध राहण्याचे आवाहन

सिसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे स्पष्टपणे दिसून आले घरात लावलेल्या सिसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरटे स्पष्टपणे कैद झाले असल्याचे  घरमालक नाजीम पार्टि यांनी सांगितले आहे.
चोरट्यांनी मास्क लावले असले, तरी त्यांच्या हालचाली, शरीरयष्टी व कपड्यांवरून ओळख पटण्याची शक्यता आहे. पोलिसांकडे फुटेज दिले असून ते बारकाईने तपासणी करत आहेत, असे नाजीम पार्टि यांनी  बोलताना सांगितले.
पोलीस तपास सुरू – नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
या प्रकारानंतर जामनेर पोलीस निरीक्षक श्री. कासार यांनी तात्काळ तपास सुरू केला असून काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. या तपासात तांत्रिक पुरावे, सिसीटीव्ही विश्लेषण आणि स्थानिक माहिती यांचा वापर करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक कासार यांनी जनतेला उद्देशून आवाहन करत सांगितले-घर बंद करून बाहेर जाताना शेजाऱ्यांना माहिती द्या, शक्य असल्यास सीसीटीव्ही यंत्रणा वापरा आणि अनोळखी हालचालींवर लक्ष ठेवा. काहीही संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला कळवा.या घटनेमुळे जामनेर शहरात चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. पोलिसांनी लवकरच गुन्हेगारांना गजाआड करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. नागरिकांमध्ये सुरक्षा सजगतेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आता पोलीस यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे.
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *