जामनेरात खान्देशस्तरीय १५ वे मराठी साहित्य संमेलन

जामनेर: दि.१० खान्देशातील साहित्य क्षेत्रातील अग्रेस जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने जामनेर येथे एक दिवसीय पंधरावे खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे. सोनबडीं जवळील, बोहरा सेंट्रल स्कूल, जळगांव रोड, जामनेर येथे रविवार, दि. १९ जानेवारी सकाळी ९ वा. हे संमेलन होणार असल्याची माहिती मंडळाचे सहसचिव जितेंद्र गोरे यांनी दिली आहे.
संमेलनाच्या कालावधीसाठी परिसरास स्व. हिरालाल अमृतलाल बोहरा साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे.
उत्कृष्ट साहित्त्यिक पुरस्कार-२०२४ चा पुरस्कार प्राप्त पिंपळनेर, ता. साक्री येथील प्रा. त्रिशिला साळवे / तायडे हे संमेलनाचे अध्यक्ष पद भूषणचणार असून पाचोरा येथील एन.एम. कॉलेजचे प्राचार्य मा. श्री. प्रा. डॉ. शिरीष पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे सकाळी १० वाजता उद्घाटन होणार असून नेरी येथील माजी जळगांव जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप बळीराम खोडपे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष तर जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे समारोपीय सत्राचे अध्यक्ष पद भूषणविणार आहेत.
संमेलन प्रसंगी विशेष सत्कारार्थी म्हणून अध्यक्ष, ज. जि. निवृत्त सेवा संघ, जामनेर पं.ना. पाटील गुरुजी, सामाजिक कार्यकर्त्या सौ. ताराबाई कोठारी, सावित्री शक्तीपीठ अध्यक्षा सौ. ज्योत्स्ना विसपुते, नाशिकचे ज्येष्ठ रंगकर्मी संदीप पाचंगे, ज्येष्ठ पत्रकार मोहन सारस्वत, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संदीप पाटील, जिनियस मास्टर्स फाऊंडेशनचे रमेश कांतिलाल पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
संमेलनास मान्यवर अतिथी म्हणून मा. नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन, जैन इरिगेशन सि.लि. चे अशोकभाऊ जैन, ज्येष्ठ साहित्यिक अशोक कोळी, जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल, से.नि.उ.वि.अभियंता जे. के. चव्हाण साहेब, जा.ता. एज्यू, सोसा. जामनेरचे सचिव जितेंद्र पाटील, कबचीउमवि, जळगाव मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. संदिप माळी, पाचोरा म.सा. परिषदचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. वासुदेव वले, ॐ शांती बांदाबाई अमृतलाल बोहरा चॅरीटेबल ट्रस्टचे चेअरमन अनिलकुमार हिरालाल बोहरा तसेच मा. उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, मा. गटनेता न.प. डॉ. प्रशांत भोंडे, पं. स. माजी गटनेता अमर पाटील, पाळधी येथील ज्येष्ठ कवि तुकाराम पाटील, डॉ. अमोल रत्नाकर शेठ, डॉ. निळकंठ पाटील, ज्ञानगंगा मा.वि.व क.म.वि.प्राचार्य राजेंद्र सोनवणे, ह.भ.प.प्रा.आर.ए.पाटील सर, सामाजिक कार्यकर्ते कैलास (बापू) चव्हाण, से.नि. अभियंता पी. के. पाटील, महा. अनिस तालुका कार्याध्यक्ष बी. आर. पाटील सर, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एस.पी. महाजन, से. नि. मुख्याध्यापक पी. टी. पाटील, जामनेर कॉलेज मराठी विभाग प्रमुख प्रा. विजयेंद्र पाटील, प्रा. अक्षय घोरपडे, मोहनभाई पमनानी, उद्योजक अभय बोहरा, सुनिल फुलफगर, महा. अनिस जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोच्हाडे, कलाशिक्षक सुभाष मोरे, प्रशांत वाघ सर आदी. उपस्थित राहणार आहेत.
पहिल्या सत्रात स्वागत व ग्रंथ दिंडी, उद्घाटन समारंभ होईल. उ‌द्घाटनानंतर कथाकथन द्वितीय सत्र मेहुणबारे माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचे प्राचार्य विश्वास पाडोळसे, नाहाटा कॉलेजचे प्रा. पुरूषोत्तम हाजन यांचे अध्यक्षतेखाली होईल कथाकथन सत्रात जळगाव येथील राहूल निकम, डॉ. सौ. स्वाती विसपूते, विजय सैतवाल सर, डॉ. संगिता गावंडे, पहर रमेश बनकर यांचा सहभाग असेल.
तिसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन बुलढाणा येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुभाष किन्होळकर, धरणगावचे कवी बी. एन. चौधरी, पहरचे मधु पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यात अनेक कवी सहभागी होतील.
चौथ्या सत्रात खान्देशस्तरीय कविसंमेलनातील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस, सहभाग प्रमाणपत्र वितरण व साहित्यिक पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पाचवे सत्रात समारोपीय भाषण जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांचे तर गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार, उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांची उपस्थिती लाभणार आहे.
संमेलना उद्घाटन सोहळ्यापासून उपस्थितीचे आवाहन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डी. डी. पाटील, उपाध्यक्ष मधु पांढरे, सचिव गोरख सूर्यवंशी, सहसचिव जितेंद्र गोरे, कोषाध्यक्ष सुकदेव महाजन व सर्व सन्माननिय सदस्य मंडळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *