जात न्याय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचं नामदार गिरीश महाजन यानी केले स्वागत-पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे मानपूर्वक आभार

जळगाव(प्रतिनिधी)दि. ३० एप्रिल – केंद्र सरकारने घेतलेल्या जात न्याय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचे जाहीर स्वागत मंत्री आणि भाजपा नेते नामदार गिरीश महाजन यांनी केले आहे. महाजन यांनी म्हटले की, “हा निर्णय संपूर्ण देशाच्या सामाजिक समावेशकतेसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या निर्णयामुळे समाजाच्या सर्व घटकांचा न्यायाधिष्ठित विकास साधता येईल. केंद्र सरकारने घेतलेला हा दूरदृष्टीपूर्ण निर्णय वास्तवात सामाजिक न्याय प्रस्थापित करणारा आहे.” ते पुढे म्हणाले, “या निर्णयामुळे मागासवर्गीय, ओबीसी, एससी-एसटी आणि इतर दुर्बल घटकांची अचूक माहिती मिळून, त्यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा अधिक प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करता येईल. ही जनगणना ही सामाजिक न्याय आणि सशक्त धोरणनिर्मितीचा पाया ठरेल.”“या ऐतिहासिक निर्णयाबद्दल देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र भाई मोदी व केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शहा यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. त्यांच्या नेतृत्वाखाली देश खऱ्या अर्थाने ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या संकल्पनेवर वाटचाल करत आहे,” असेही महाजन यांनी नमूद केले.महाजन यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, हा निर्णय केवळ आकडेवारीसाठी नसून, तो सामाजिक समतेसाठी आधारभूत ठरेल. भविष्यातील निर्णयप्रक्रियेसाठी ही जनगणना दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *