जामनेर(प्रल्हाद सोनवणे)आज दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी जागतिक एडस दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय जामनेर व गिताबाई दत्तात्रय महाजन कला ,श्री केशरीमल राजमल नवलखा वाणिज्य व मनोहर शेठ धारिवाल विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने एडस जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग ,राष्ट्रीय छात्र सेवा विभाग व महाविद्यालयीन विद्यार्थी व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस खडायते यांच्या हस्ते रिबीन कापून एडस जनजागृती रॅलीचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन विसपुते सर संदीप पाटील , विक्रांत परदेशी, आशा चौधरी (लिंक वर्कर) राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी डॉ रविंद्र वाघ महिला कार्यक्रम अधिकारी मनिषा चौधरी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ अरविंद राऊत कॅप्टन डॉ.अमर पवार उपप्राचार्य डि एस पाटील मोठ्या संख्येने विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयम् सेवक आणि राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
जागतिक एडस दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने एडस जनजागृती रॅलीचे आयोजन

Leave a Reply