जामनेर(प्रतिनिधी)शासनाने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शासकीय खरदेसाठी सोयाबीनची उत्पादकता खूपच कमी केली आहे.सातारा जिल्ह्यासाठी 26 क्विंटल,कोल्हापूर जिल्ह्यासाठी 23 क्विंटल,अहील्यानगर साठी 19 क्विंटल .मात्र जळगाव जिल्ह्यासाठी 10 क्विंटल उत्पादकता ठरविली आहे.जळगाव जिल्ह्यातील शेतकरी हेक्टरी 20 ते 25 क्विंटल सोयाबीन चे उत्पादन सरासरी काढतात.मात्र सरकार फक्त हेक्टरी 10 क्विंटल सोयाबीन सरकारी भावाने खरेदी करते. हेक्टरी 10 क्विंटल सोयाबीन सरकारी भावाने विकल्यानंतर बाकीचे सोयाबीन शेतकऱ्याने कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांच्या घशात घालाचे का ? इकडे वृत्त पत्रात बातमी येते की महाराष्ट्रात सरकारी भावाने सोयाबीन ची खरेदी कमी होत आहे.जळगाव जिल्हा शासकीय खरदिसाठी सोयाबीन ची उत्पादकता हेक्टरी कमीत कमी 25 क्विंटल मंजूर केल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही त्यांना त्यांनी उत्पादन केलेले बहुतांश सोयाबीन सरकारी भावाने विकता येईल.त्यात राजकारण्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.तसेच काही शेतकऱ्यांना भीती वाटत आहेकी आपण सरकारी भावाने सोयाबीन विकले त्यांचे कडील कर्ज हे पेमेंट चे वेळेस कापून घेतले जाईल.त्या भीती मुळे सर्वसामान्य शेतकरी सरकारी भावाने सोयाबीन विकत नाही.सरकारने त्या बाबत स्पष्ट भूमिका जाहीर करणे आवश्यक असल्याची मागणी दत्तात्रय दाजीबा वाघ या शेतकऱ्याने केली आहे.
जळगाव जिल्हा शासकीय खरदिसाठी सोयाबीन ची उत्पादकता हेक्टरी कमीत कमी 25 क्विंटल करावी.

Leave a Reply