जळगांव(प्रतिनिधी)जळगाव खान्देश मराठा वधुवर ग्रुप च्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील यांच्या प्रयत्नातून नुकताच चि.रोहन केशवराव पाटील पाटील रा.नावरा. ता. धुळे ह. मु.जळगाव व चि.का.सौ.अंकिता ईश्वरचंद्र पाटील रा.मालखेडा ता.चोपडा जि.जळगाव ह.मु.पुणे यांचा विवाह संबंध जुळवून २४/११/२०२४ रविवार रोजी जळगाव येथील कृष्णा लॉन्स येथे शिवधर्म विवाह संस्कार पद्धतीनुसार विवाहसोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.विशेष म्हणजे विनाहुंडा हा विवाहसंबंध जुळवण्यात आला.यावेळी स्वतः सुमित पाटील यांची देखील उपस्थिती होती.वरील दोन्ही परिवारांनी सर्वसंमतीने बिनाहुंडा साखरपुडा करण्याचा संकल्प केला होता.दोन्ही परिवाराचा हा संकल्प मराठा- कुणबी समाजातील आदर्श परंपरेचा श्रीगणेशा आहे असे मत वधूवर ग्रुपचे अध्यक्ष सुमित पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.ही परंपरा आपल्या ग्रुपचा नवीन पायंडा म्हणून निश्चितच अनुकरणीय आहे.हि परंपरा सर्वमान्य होत असल्याचा मला अभिमान आहे.बिनाहुंडा विवाह हि काळाची गरज असून या पद्धतीचे अनुकरण समाजातील सर्वच लहान-मोठे, श्रीमंत व गरीब परिवारांनी करावे.असे आवाहन सुमित पाटील,शिवमती कोकीळा सुमित पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष वधु वर सुचक कक्ष मराठा सेवा संघ यांनी या निमित्ताने ग्रुप तर्फे केले आहे.आपल्या ग्रुप च्या माध्यमातून जुळलेल्या या आदर्श संबंधासाठी उपाध्यक्ष किशोर पाटील,भैय्यासाहेब निलेश पाटील सर सर्व ग्रुप एडमिन यांचे देखील सहकार्य लाभले.भविष्यात असे एक ना अनेक शुभयोग जुळून येवोत यासाठी आपल्या खान्देश कुणबी मराठा वधुवर परिचय ग्रुपवर जास्तीत जास्त बायोडेटे पाठवावेत अशी नम्र अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
जळगाव खान्देश मराठा वधुवर ग्रुप च्या माध्यमातून “विना हुंडा विवाह संबंध “जुळवण्याचे कार्य अविरत करत राहणार – सुमित पाटील

Leave a Reply