जामनेर -(प्रतिनिधी)- जळगाव जनता सहकारी बँक शाखा जामनेर चा 37 वा वर्धापन दिन उत्साह साजरा झाला. यावेळी जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदने यांच्या हस्ते बँकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पाणपोई सेवेचे उद्घाटन करण्यात आले. बँकेचे सल्लागार शिवराम महाले आप्पा, प्रकाश कोठारी , पंडित सर ,यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. जामनेर शाखा व्यवस्थापक विलास मते उपव्यवस्थापक प्रताप कोपरकर, कर्मचारी राजेंद्र चौधरी, शुभम जोशी, निलेश सपकाळ, मनोहर सुरळकर ,मयूर इंगळे यांनी यावेळी आलेल्या मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.
वर्धापन दिनानिमित्त बँकेचे सभासद दीपक तायडे व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. रा .स्व. संघाचे संघचालक एड. प्रमोद सोनार, संघाचे शहर कार्यवाह आशुतोष पाटील, तालुका कार्यवाह सोनवणे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सेवा प्रमुख डॉक्टर मनोज विसपुते ,गजानन लोणारी, उपस्थित होते. यावेळी बँकेचे ठेविदार, ग्राहक, कर्जदार यांचा प्राथमिक स्वरूपात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बँकेचे ग्राहक सुधीर साठे, ए.एस .पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शहरातील व्यापारी राजकुमार कावडीया ,गोविंद अग्रवाल, अनिकेत पाटील, संदीप पाटील, शुभम इंगळे, अभय कुमार जैन, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, तालुका सचिव रवींद्र झाल्टे, यांनी बँकेच्या प्रगती बद्दल कौतुक केले. शेवटी शाखा व्यवस्थापक विलास मते यांनी सर्वांचे आभार मानले.
Leave a Reply