जामनेर (प्रतिनिधी)पाळधी, ता. जामनेर | दिनांक: ३० मे २०२५ राज्य शासनाच्या निर्देशानुसार “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” आज पालधी (ता. जामनेर) येथील माळी समाज मंगल कार्यालयात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. शिबिरात २५ विविध शासकीय विभागांनी सहभाग घेत एकाच छताखाली नागरिकांना थेट योजनांचे लाभ दिले.
शिबिराची सुरुवात निवासी नायब तहसीलदार श्री. प्रशांत निंबोलकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत लाभांचे वितरण करण्यात आले.विभागनिहाय लाभ वितरण –• संजय गांधी योजना (DBT प्रक्रिया पूर्ण): ३५० लाभार्थी• तालुका कृषी अधिकारी कार्यालय: १०२ सेवा लाभ• पुरवठा शाखा (शिधापत्रिका): ६७ लाभ• सेतू केंद्राद्वारे मिळालेले दाखले:• उत्पन्न दाखले: ३७• जातीचे दाखले: २४• वय, अधिवास व रहिवास दाखले: ४६• ग्रामपंचायत विभाग (जॉब कार्ड वाटप): १४ लाभार्थी एकूण लाभित नागरिकांची संख्या: ६४०
या शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण, ग्रामविकास, रोजगार हमी योजना आदी विभागांनी थेट सेवा दिली.
शिबिरात आलेल्या नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
“सर्व विभाग एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने कागदपत्रे मिळवणे आणि अर्ज प्रक्रिया खूपच सुलभ झाली.”
“योजनेचा लाभ मिळवण्यासाठी यापूर्वी तालुक्याच्या फेऱ्या कराव्या लागत होत्या. आज मात्र गावातच सर्व प्रक्रिया पूर्ण झाली.”
“संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असून कर्मचारी मार्गदर्शन करत होते, त्यामुळे घाईगडबड न होता सर्व लाभ वेळेवर मिळाले.”
“अशा प्रकारची शिबिरे नियमितपणे घेण्यात यावीत, यामुळे गावपातळीवरच सुविधा मिळतात.
या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाची “शासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रभावीपणे राबवली गेली असून, नागरिक केंद्रित सेवा पुरवठ्याचा आदर्श नमुना पालधीत अनुभवता आला
Leave a Reply