जामनेर (प्रतिनिधी)गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने झालेल्या सन्मान सोहळ्यात कापड आणि रेडिमेड व्यवसायात आपल्या फर्मला दिलेल्या योगदानाबद्दल 60 वर्षावरील जेष्ठ सदस्यांचा गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त साधून त्यांचा सन्मान करण्यात आला काल झालेल्या सन्मान सोहळ्याचे अध्यक्षपद माननीय , माजी नगराध्यक्ष श्री.राजू शेठ बोहरा . रूपम वस्त्रालय यांनी स्वीकारले.
यावेळी झालेल्या सन्मान सोहळ्यात खालील ज्येष्ठ सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यात प्रामुख्याने विजयराजजी भुरट ( विजयराज युगराज जैन ),रामदास विठ्ठल चिंचकर ( रामदास विठ्ठल ग्रुप ),राजू शेठ बोहरा (रूपम वस्त्रालय) , युवराजजी बागमार ( महावीर क्लाथ ),लालचंदजी चंदनानी ( श्याम ड्रेसेस ),प्रकाश शेठ पाटील (भाग्योदय कलेक्शन ),प्रीतमजी पमनानी ( गगन कलेक्शन) , रमणलालजी कोठारी (कोठारी ड्रेसेस ),प्रवीणजी डांगी ( संदीप ड्रेसेस ), पवन कुमारजी सांकला ( सत्यम ड्रेसेस ) , शांतीलालजी कोठारी ( ईश्वर ड्रेसेस ), दिलीपजी भुरट ( शितल साडीया ),रतनजी रीछवाल ( शिव कलेक्शन )
यावेळी झालेल्या सन्मान सोहळ्यात भाग्योदय कलेक्शनचे संचालक प्रकाश शेठ पाटील यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना मनोगत व्यक्त केले , अध्यक्ष भाषण करताना राजू शेठ बोहरा यांनी व्यवसाय वाढीसाठी सूक्ष्म नियोजन कसे असावे याचे अमूल्य मार्गदर्शन केले.
सन्मान समारंभ वेळी , रेडिमेट कापड असोसिएशनचे अध्यक्ष संजय चिंचकर , उपाध्यक्ष सुनील पाटील , सुशील बोहरा ,अभय साखला,रोशन डांगी ,रोहित बागमार, ललित कोठारी ,घनश्याम चंदनानी , अनिल चंदनानी, प्रीतम शेठ पमनानी , राजूशेठ शर्मा , दीपक रिचवाल , यांचे सह सर्व कापड रेडिमेट व्यापारी उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शन अध्यक्ष संजय चिंचकर यांनी केले.
Leave a Reply