जामनेर (प्रतिनिधी)कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव येथे आयोजित “राष्ट्रीय सेवा योजना कार्यगौरव सोहळा-२०२३-२४” कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित संपन्न झाला.
युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष मंत्रालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव येथे आयोजित “राष्ट्रीय सेवा योजना कार्यगौरव सोहळा-२०२३-२४” कार्यक्रम केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वंयसेवक व शिक्षकांचा गौरव केला तसेच उपस्थित स्वंयसेवक यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन केले. तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव येथे उपलब्ध असलेल्या विविध क्रीडा सुविधांची पाहणी करून माहिती घेतली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र. कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, राज्यपाल नियुक्त व्य.प.सदस्य श्री.राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, रासोयो संचालक डॉ.सचिन नांद्रे ई. प्रमुख उपस्थितीत होते.
Leave a Reply