जामनेर (प्रतिनिधी )जामनेर येथील पंडित दीनदयाल शिक्षण संकुलनात एकलव्य प्राथमिक व ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात ७६वा प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र सोनवणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी उपशिक्षक निलेश पाटील यांनी संविधान वाचन केले. तर विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र सोनवणे यांनी तंबाखू मुक्ती ची शपथ सर्वांना दिली.
त्यावेळी संस्थेचे मार्गदर्शक संचालक एडवोकेट शिवाजी सोनार, के.बी.माळी तसेच सिनेट सदस्य दीपक पाटील, एकलव्य विद्यालयाचे निलेश पाटील, आयएमआर कॉलेज चे प्राचार्य किशोर पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यालयात कला उत्सव साजरा करण्यात आला.त्यात एकलव्य बाल विकास प्राथमिक माध्यमिक व ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले.त्यावेळी ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाचे चित्रकला विभागात राज्यस्तरीय निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन संस्थेचे सचिव के.बी. माळी व सर्व प्रमुख अतिथींच्या वतीने गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती स्नेहल पाटील व सपना सरताळे मॅडम यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Leave a Reply