इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयाचे “प्रेरणा महोत्सव” उत्साहात संपन्न: नृत्याविष्कार, वाद्य गायन, पोवाड्याने आणली रंगत…..

जामनेर (प्रतिनिधी)जामनेरपुरा: येथील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयातील “प्रेरणा महोत्सव व बक्षीस वितरण” समारंभ आज सकाळी ९ वा. नुकताच संपन्न झाला सुरुवातीस दीप प्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे सचिव किशोर भाऊ महाजन यांच्या हस्ते झाले याप्रसंगी संचालक गुरुजी विष्णू पाटील, संचालक के व्ही महाजन, संचालक फकीरा काका धनगर, मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपप्राचार्य प्रा.के एन मराठे, पर्यवेक्षक प्रा.के डी निमगडे आदी.मान्यवरांची उपस्थिती होती.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना रोकडे, पलक ओसवाल,वैष्णवी सुशिर,संचीता पाटील,साधना माळी, साक्षी तेली या विद्यार्थ्यांनी केले.
नटरंग उभा गीत प्रा.सचिन बावस्कर यांनी गाऊन कार्यक्रमाची रंगत आणली कार्यक्रमात वैयक्तिक गीत, नृत्य, समूहगीत गायन, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, ढोलकी तबला वादन, बासरी आदी. विविध असे एकूण ४१ कार्यक्रम सादरीकरण केले
शेलापागोट्याचे खुमासदार शैलीत वाचन प्रा.विजय पाटील, प्रा.माधुरी महाजन यांनी केले.
दुपार सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम तथा विविध कला, क्रीडा, गुणवत्ताधारक विद्यार्थी कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण समारंभ जामनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रास्ताविक सचिव किशोर भाऊ महाजन यांनी केले याप्रसंगी संचालक फकीरा काका धनगर, संचालक श्रीराम नाना महाजन, संचालक के.व्ही महाजन, मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपप्राचार्य प्रा के एन मराठे, उपमुख्याध्यापक एस एन चवरे, पर्यवेक्षक प्रा.के डी निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी जी अत्तरदे, कला समन्वयक प्रा.डी झेड गायकवाड, एस पी मोरे आदी.मान्यवरांची उपस्थिती होती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सविता महाजन यांनी तर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.समीर घोडेस्वार, प्रा.रूपाली पाटील यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून प्रा.हर्षा दहिलेकर, प्रा.दिनेश महाजन, प्रा.सुमित काबरा, प्रा.मनीषा घडेकर यांनी काम पाहिले तर स्टेज तांत्रिक समिती प्रमुख प्रा.सचिन गडाख, हरीश साळुंखे, निलेश पाटील यांनी काम पाहिले
बक्षीस वितरण समिती प्रमुख प्रा.शुभम शंखपाळ, प्रा.राजश्री पाटील, प्रा.कांचन पाटील, प्रा.धनश्री पाटील यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सविता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.संजय क्षीरसागर, प्रा.आर आर पाटील, प्रा.संदीप राजपूत, प्रा.सोनूसिंग पाटील, प्रा.राजेश खडके, प्रा जे आर पाटील, प्रा.रचना वंजारी, प्रा.वैशाली पाटील, प्रा.दिपाली राजपूत, प्रा.विजेता परदेशी, प्रा.माधुरी तायडे, प्रा.पूजा पाटील, प्रा.कोमलसिंग परिहार, प्रा.रवींद्र शेले, प्रा.सतीश क्षीरसागर, प्रा.योगेश पोळ,आदी. तथा शिक्षकेत्तर कर्मचारी सुधाकर सुरळकर, निलेश चौधरी, राहुल काळे यांनी परिश्रम घेतले.
—————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *