आशा स्वयंसेविकांचे कामकाज तळागाळात तहसीलदार नानासाहेब आगळे. आरोग्य विभागाकडून आशा दिन उत्साहात.

जामनेर(प्रतिनिधी)जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभाग जामनेर च्या वतीने आशा दिनाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने व स्त्रीशक्ती पूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नानासाहेब आगळे तर प्रमुख पाहुणे माजी नगरसेविका संध्याताई पाटील,आनंदयात्री परिवाराचे अध्यक्ष डॉ.अमोल शेठ हे होते.
आशा स्वयंसेविका यांच्या कार्याचा सत्कार सन्मान करणे तसेच त्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आशा दिनाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती प्रास्ताविकात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सूर्यवंशी यांनी केले तर डॉ.मोहित जोहरे यांनी आभार मानले.


“ग्रामीण भागात आरोग्याचे दैनंदिन कामकाज करताना गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका प्रचंड मेहनत घेतात. प्रत्येक गावात गावाच्या प्रत्येक भागात अशा स्वयंसेविका या काम करीत असल्याने आरोग्य विभाग हा कामकाजाचे उद्दिष्ट सहज पूर्ण करू शकतो.कोव्हिड काळात आशा स्वयंसेविका यांनी उत्कृष्ट कामकाज केले,आशा स्वयंसेविका ह्या आरोग्य यंत्रणेचा कणा असल्याचे मत” तहसीलदार नानासाहेब आगळे व मान्यवरांनी व्यक्त केले.
आशा स्वयंसेविकांनी रांगोळी,गीत गायन,चित्रकला,निबंध स्पर्धेत हिरारीने सहभाग घेऊन “बेटी बचाओ बेटी पढाव” चा संदेश दिला.


कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास काळे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पल्लवी राऊत, डॉ. मोहित जोहरे, डॉ.चारुशीला ठाकूर,डॉ.नरेश पाटील,डॉ. नंदलाल पाटील,डॉ.संदीप पाटील,डॉ.पराग पाटील,डॉ.सागर पंडित,डॉ.आशिष महाजन,अमरीश चौधरी,गणेश राऊत,तालुका समूह संघटक प्रदीप पाटील,बशीर पिंजारी,प्रवीण दाभाडे, राजु तडवी,गोपाळ पाटील,किशोर पाटील,भागवत वानखेडे,पुंडलिक पवार,विक्रम राजपूत,हेमंत पाटील,स्वप्नील महाजन सर्व गटप्रर्तक व मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *