
जामनेर(प्रतिनिधी)जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने आरबीएल बँक मार्फत जामनेर तालुक्यातील सहा शाळांमधील 300 मुलींना मोफत सायकल व स्कूल कीट आज वाटप करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद मराठी शाळा वाकी रोड या ठिकाणी आयोजन केले होते.

oplus_2
वरील कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन, सेवानिवृत्त उप अभियंता जे. के. चव्हाण, न्यू इंग्लिश स्कूल जामनेरचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपा अध्यक्ष चंद्रकांत बावस्कर, नगरसेवक आतीश झाल्टे, सचिव दिपक तायडे, उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे, गटशिक्षणाधिकारी राम लोहार, आरबीएल बँकेचे प्रमुख बाळकृष्णन, आरबीएल बँकेचे सीएसआर प्रमुख रोहित अग्रवाल आदी उपस्थित होते.

oplus_2
आरबीएल बँकेच्या उम्मीद या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवास करताना अडथळा येऊ नये, त्यांचा शिक्षनाचा प्रवास सुरू राहावा म्हणून आज या उपक्रमांतर्गत 300 सायकलीचे वाटप करण्यात आले. यात जिल्हा परिषद शाळा तळेगाव 81, जिल्हा परिषद शाळा शेळगाव 18, जिल्हा परिषद शाळा मेनगाव , जिल्हा परिषद शाळा गोद्री 20, जिल्हा परिषद उर्दू शाळा तोंडापूर 119,या सहा शाळांमधील विद्यार्थिनींचा समावेश होता.
यावेळी आरबीएल बँकेचे उपक्रमाचे कौतुक भाजपाध्यक्ष चंद्रकांत बावस्कर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले, पुढील अशी देखील याप्रमाणे सी एस आर फंडातून इतर शाळाना देखील सायकल वाटप करावे असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख संदीप पाटील यांनी केले तर आभार आरबीएल बँकेचे रोहित अग्रवाल यांनी केले. एवढी संभाजी राजांच्या बलिदान दिनाचे स्मरण त्यांना आदरांजली वाहत करण्यात आले..
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख विकास वराडे, संजय पाटील सुरेश आंभोरे, संदीप पाटील, लाभार्थी विद्यार्थी पालक, शिक्षण विभाग सर्व कर्मचारी, साधन व्यक्ती, विषय तज्ञ, तळेगाव शाळा टीम,तसेच आरबीएल अधिकारी कर्मचारी रेखा बोरोले, व त्यांची टीम यांनी मेहनत घेतली.
Leave a Reply